आमिरने व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देण्यासाठी पहिला नशा' या रोमँटिक गाण्या बरोबरच सर्वांना आश्चर्य करणारी गोष्ट शेअर केली आहे .'मी जेव्हा दहा वर्षांचा असताना टेनिस कोर्टमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी जात होतो तेव्हा मला एका मुलीवर प्रेम झाले होते.लहान असल्यामुळे मी ते व्यक्त करू शकलो नाही. या क्लासमध्ये ४०-५० जणांचा ग्रुप होता. ज्यामध्ये एक मुलगी होती तिला मी पाहतच राहायचो. पाहिल्याच नजरेत मला तिच्यावर प्रेम झाले होते. दिवस-रात्र मी तिच्याच विचार करत होतो. 'पहला नशा' गाण्याप्रमाणे 'उडता ही फिरू इन हवाओं मे कही' तसे मी हवेमध्ये उडत होतो. परंतु, तिला हे सांगण्याची माझी हिंम्मतच नाही झाली.' 'ती मुलगी १० वर्षाची आणि खूप सुंदर होती. दरम्यान एका वर्षात मी टेनिसमध्ये चांगला ट्रेन झालो होतो. दीड वर्षांनंतर तिची फॅमिली शिफ्ट झाली. हे 'सायलेन्ट लव्ह' मी कधीच पूर्ण करू शकलो नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews